येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला तालुक्यातील अनकुटे येथील विठ्ठल गायकवाड या कलाकाराने २ लाख ४१ हजार बटन व धाग्यांचा वापर करीत शिवरायांची प्रतिकृती साकारली आहे. ही प्रतिकृती साकारण्यासाठी या कलाकाराला ३ वर्ष आठ महिन्याचा कालावधी लागला आहे.
आज शिवराज्यभिषेक सोहळा दिना निमित्ताने अनकुटे येथील शनिमंदीर परिसरात ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे. शनी जयंती निमित्ताने भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असल्याने आलेल्या भाविकांना ही अनोखी प्रतिकृती पाहता यावी यासाठी ती शनीमंदीर परिसरात प्रर्दशनासाठी ठेवण्यात आली आहे.