नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मखमलाबाद शिवारातील शांतीनगर भागात राहणा-या २२ वर्षीय विवाहीतेने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रूपाली सागर जाधव (रा.श्रीमंगल पार्क रामकृष्णनगर) असे मृत महिलेचे नाव आहे.
रूपाली जाधव या विवाहीतने मंगळवारी (दि.४) रात्री आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये पंख्यास स्कार्प बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच पती सागर जाधव यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार गवारे करीत आहेत.
शेजारी कुटुंबियांनी मायलेकास केली मारहाण
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – किरकोळ वादाची कुरापत काढून शेजारी कुटुंबियांनी मायलेकास मारहाण केल्याची गटना जुई नगर भागात घडली. या घटनेत मारहाण करीत संशयितांनी तुम्ही येथे कसे राहतात असा दम भरल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंधू माने व तिचे मुले सचिन व स्वप्नील आदीं संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिरीन जावेद खाटीक (३३ रा.सुरभी सोसा.जुईनगर) या महिलेने फिर्याद दाखल केली आहे. संशयित व तक्रारदार पिडीता एकमेकांचे शेजारी आहेत. बुधवारी (दि.५) संशयितांनी सोसायटीच्या आवारात खाटीक यांना गाठून तुम्ही आमच्या पाहुण्यांकडे एकाचे दोन सांगतात या कारणातून वाद घातला.
यावेळी संतप्त संशयितांनी महिलेस शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केली. यावेळी पिडीतेचा मुलगा त्यांच्या मदतीला धावून आला असता त्यालाही संशयितांनी लाथा बुक्यांनी मारहाण केली. अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.