नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गोमांसाची वाहतूक करणारा टेम्पो पोलीसांच्या पकडला असून चालकास गजाआड केले आहेत. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात टेम्पो चालकासह मास वितरण व्यवस्थेतील अन्य चौघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली.
अझहर सफदर खान (३१, रा. सल्ली पॉईंट, राजवाडा, वडाळागाव) असे अटक करण्यात आलेल्या टेम्पो चालकाचे नाव असून शोएब समद कुरेशी (रा.वडाळागाव),नजीर पूर्ण नाव पत्ता नाही,बबलू कुरेशी व अजीज कादीर कुरेशी अशी आदी संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत. युनिटचे अंमलदार तेजस मते यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. वडाळागावात गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्री करण्यासाठी टेम्पोमधून नेले जाणार असल्याची खबर पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.५) सायंकाळी वडाळागावात सापळा लावण्यात आला होता.
सेंट सादिक स्कुल रोडवरील नाशिक स्टील ट्रेंडर्स भागात एमएच ४१ एयु ४०४९ टेम्पो अडवून पथकाने पाहणी केली असता त्यात गोवंश मास आढळून आले. चालकास बेड्या ठोकत पथकाने टेम्पोसह मास असा सुमारे ६ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला असून पोलीस तपासात उर्वरीत संशयितांची नावे चालकाने उघड केल्याने याप्रकरणी अंमलदार तेजसमते यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार खरोटे करीत आहेत. ही कारवाई युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, हवालदार संजय सानप, मनोहर शिंदे, परमेश्वर दराडे, विशाल कुंवर, समाधान वाजे, महेश खांडबहाले, तेजस मते, स्वप्निल जुंद्रे आदींच्या पथकाने केली.