इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना पत्नीचा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवल्यानंतर पवार विरुध्द पवार हा संघर्ष कायम राहणार असल्याची स्थिती आहे. त्यात आता पहिला झटका हा युगेंद्र पवार यांना बसला आहे.
अजित पवार यांच्या सांगण्यावरुन बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन युगेंद्र पवार यांची उचलबांगडी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. बैठकीला उपस्थित न राहिल्याचे कारण पुढे करत अध्यक्षपदावरुन दूर करण्यात आले आहे. युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे सख्खे पुतणे असून निवडणुकीत त्यांनी विरोधात काम केले. त्यामुळे त्यांना हा झटका देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे बारामती विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून त्यांच्या उमेदवारी शक्यता आहे. त्यामुळे पहिले त्यांना हा धक्का अजित पवार यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांनी मोठा लीड घेतल्यामुळे अजित पवार गटही आता कामाला लागला आहे.