इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभेच्या निवडणुकाचे निकाल घोषित झाल्यानंतर आता मतदानाची टक्केवारी समोर येत आहे. त्यात कोणत्या विधानसभा मतदार संघात किती मते मिळाली याचे गणित लावले जात आहे. कोकणात राणे कुटुंबियांनी विधानसभा मतदार संघ निहाय मते बघितल्यानंतर त्यांचा पार चढला आहे. त्यामुळे त्यांनी दोन मतदार संघात थेट दावाच केला आहे. त्यामुळे महायुती समोरील अडचणी वाढणार आहे.
राजापूर व रत्नागिरी मतदार संघात नारायण राणे यांना मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे निलेश व नितेश राणे यांनी या विधानसभेवर भाजप आगामी काळात निवडणूक लढवणार असे सांगत दावा केला आहे. रत्नागिरीत मंत्री उद्य सामंत हे आमदार आहे. त्यामुळे महायुतीसमोर संघर्षही पुढे वाढणार आहे.
निलेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटले आहे की, नितेशने फक्त राजापूर मतदार संघावर भाजपचा दावा सांगितला… माझं म्हणणं आहे रत्नागिरी विधानसभा मतदार संघ पण पारंपारिक भारतीय जनता पार्टीचा आहे तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणार.