इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील ८ व्या सामन्यात ए ग्रुपमधील भारतीय संघाने आयर्लंडला पराभूत केले. भारतीय संघाने हा सामना ८ विकेट्सने जिंकला आहे. आयर्लंडने टीम इंडियाला विजयासाठी ९७ धावांचे आव्हान दिल्यानंतर टीम इंडियाने हे आव्हान १२.२ ओव्हरमध्ये २ विकेट्स गमावून पूर्ण केले.
भारतीय संघानकडून रोहित शर्मा याने सर्वाधिक ५२ धावा केल्या. ऋषभ पंतने २६ बॉलमध्ये नॉट आऊट ३६ रन्स केले. विराट १ तर सूर्यकुमारने २ धावा केल्या. तर आयर्लंडकडून मार्क एडेअर आणि बेंजामिन व्हाईट या दोघांच्या खात्यात १-१ विकेट गेली.