नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) राजीवनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ४३ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांसह देवांच्या मुर्ती आणि पुजेच्या साहित्याचा समावेश आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राहूल ताराचंद मोरे (रा.इंदूधन अपा.अश्वमेध कॉलनी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मोरे कुटूंबिय सोमवारी (दि.३) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मोरे यांच्या बंद घराच्या सेफ्टी डोअरचा कडी कोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे तसेच देवघरातील मुर्त्या आणि पुजेचे साहित्य असा सुमारे ४३ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला अधिक तपास हवालदार ढवळे करीत आहेत.
……..