इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी एकमताने निवड झाली. दिल्लीत आज भाजप आघाडीच्या मित्र पक्षांची बैठक झाली त्यात हा निर्णय़ घेण्यात आला. यावेळी मित्रपक्षाचे नेते उपस्थितीत होते. या बैठीकीतच सत्तास्थापनेचा निर्णय़ घेण्यात आला.
दिल्लीत आज राजकीय घडामोडी सुरु झाल्या आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा दिला. त्यानंतर १७ वी लोकसभा विसर्जित झाली. त्यामुळे आता नवीन सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहे.
एनडीए आघाडीच्या बैठकीत २६ पक्षांचे २१ नेते हजर होते. सात जूनला एनडीएच्या निवडून आलेल्या सर्वच खासदारांची बैठक दिल्लीत होणार आहे. त्यानंतर एनडीए राष्ट्रपतींकडे सत्तास्थापन करण्याचा दावा केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.