रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक जिल्ह्यात साडेचार लाख बालकांना ओआरएस व या गोळ्यांचे होणार वाटप

by India Darpan
जून 5, 2024 | 7:31 pm
in स्थानिक बातम्या
0
Untitled 27

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अर्भक मृत्यू व बाल मृत्यूदर कमी करणे, हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. देशात ५ वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारणांपैकी एक असून ५ ते ७ टक्के बालके अतिसारामुळे दगावतात. या बालमृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून राज्यात ६ ते २१ जून या कालावधीत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत पाच वर्षापेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरांमध्ये ओआरएस व झिंकचा वापर व उपलब्धता वाढवणे, अतिसारासह जल शुष्कता असलेल्या बालरुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणे आणि शहरी झोपडपट्ट्या, पूरग्रस्त भाग, भटक्या जमाती, वीट भट्टी, कामगार, स्थलांतरित मजूर व बेघर मुले इ. सारख्या जोखीमग्रस्त घटकांवर विशेष लक्ष देणे आणि मागील दोन वर्षात अतिसारातील साथ असलेले क्षेत्र, पाणीपुरवठा व स्वच्छतेचा अभाव असल्याचे क्षेत्र, यावर विशेष लक्ष देणे, हे विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रमाचे धोरण आहे.

त्यासाठी अति जोखमीच्या क्षेत्राची नियोजनाद्वारे सूक्ष्मकृती आराखडा तयार करण्यात आला असून, अतिसारामध्ये ओआरएस आणि झिंक चे महत्व, स्तनपानाचे महत्त्व, अतीसाराच्या प्रतिबंधासाठी हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व आणि शौचाची विल्हेवाट लावण्यासाठी शौचालयाचा वापर, इत्यादी महत्त्वाचे संदेश यामध्ये देण्यात येतात. सर्व शाळांमध्ये हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येऊन हात धुण्याच्या टप्प्यांविषयी पोस्टरद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाच्या व्यवस्थापन, अंमलबजवणीबाबत शुक्रवारी (दि. 31) जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सदर कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील वयोगटातील प्रत्येक बालकापर्यंत गोळ्यांचे वितरण करावे,

सार्वजनिक आरोग्य विभागाबरोबरच महिला बालविकास विभाग, शिक्षण व पाणीपुरवठा विभागानेही समन्वयाने काम करत जिल्ह्यातील बालकांना झिंक आणि ओआरएस गोळ्यांचे वितरण करत अतिसार नियंत्रण कार्यक्रमात सहभाग घेण्याच्या सूचना दिल्या. माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी मोहिमेबाबत माहिती देताना ते म्हणाले की, सदर मोहिमेदरम्यान अतिसार नियंत्रण पंधरवड्यात 5 वर्षांखालील बालके असलेल्या प्रत्येक घरी आशासेविका भेटी देऊन ओ.आर.एस. पाकीट वापरण्या बाबतचे महत्त्व सांगतील. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी अतिसाराच्या उपचारासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेत, जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्रात ओ.आर.एस. कॉर्नर तयार करण्याबाबत सर्व आरोग्य संस्थांना सूचित केले. त्यानुसार कॉर्नर तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करा – बालकांमध्ये अतिसाराची लक्षणे आढळून आल्यास आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून वैद्यकीय सल्ल्याने उपचार करून घ्यावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी केले.

ही आहेत अतिसाराची लक्षणे – सौम्य किंवा गंभीर जलसृष्टीची लक्षणे, अस्वस्थपणा, चिडचिडेपणा, डोळे खोल जाणे, घटाघटा पाणी पिणे, त्वचेला चिमटा घेतला असता त्वचा हळूहळू पुरवत होणे, स्तनपान न करू शकणे, एका दिवसामध्ये तीन पेक्षा जास्त वेळा जुलाब होणे, इ. सारखे लक्षणे जाणवल्यास त्वरित शेजारील शासकीय आरोग्य संस्थेत संपर्क साधावा.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मान्सून कुठपर्यंत आला? महाराष्ट्रात कधी बरसणार?

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड…सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग

Next Post
GPUDDlEaYAAXO v

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड…सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग

ताज्या बातम्या

nia11

पाकिस्तान हेरगिरी प्रकरणात एनआयएने ८ राज्यांमध्ये १५ ठिकाणी टाकले छापे

जून 1, 2025
crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011