इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील भाजपचे अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा दारुण पराभव झाला आहे. हा पराभव देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांना खूप जिव्हारी लागला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दिल्लीतल्या पक्ष श्रेष्ठींकडे आपल्याला पक्ष संघटना वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं, अशी विनंती पत्रकार परिषदेत केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी अशाप्रकारचं वक्तव्य करुन थेट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्र भाजपमध्ये मोठा भूकंप आला आहे. भाजपच्या सर्व दिग्गज नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांनी असा निर्णय घेऊ नये, अशी विनंती केली जात आहे.