इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या ४८ मतांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर यांनी पराभव केला. या मतदार संघात अटीतटीची लढत झाली.
शिवसेना ठाकरे गटाने मुंबईतील सर्व जागा जिंकल्या पण, ही जागा अवघ्या ४८ मतांनी त्यांना कमवावी लागली. तर दुसरीकडे मुंबईत शिंदे गटाचा एक खासदार निवडून आला.
वायकर यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांनी ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यात त्यांचा निसटता विजय झाला.









