इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी ५ हजार ५८५ मतांनी पराभव केला. या मतदार संघात जातीयवाद झाल्याचे बोलले जात होते. पण, तरी मुंडे यांना विजयाची खात्री होती. पण, त्यांचा अखेरच्या फेरीत पराभव झाल्याचे समोर आले आहे.
मुंडे यांचा पराभव भाजपसाठी मोठा धक्का आहे. सोमवारी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सकाळपासून बीडमध्ये अटीतटीची आकडेवारी समोर येत होती. रात्री शेवटच्या क्षणापर्यंत याबाबत सस्पेन्स कायम राहिला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे विजयी ठरले.
या मतदार संघात डॅा. प्रितम मुंडे यांना उमेदवारी नाकारत पंकजा मुंडे यांना भाजपने उमेदवारी दिली होती. त्यात राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत बरोबर आल्यामुळे कृषीमंत्री धनजंय मुंडे हे सुध्दा बरोबर होते. त्यामुळे एकीकडे ताकद वाढलेली असतांना हा पराभव झाला.