मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईत कांदिवली येथील महावीरनगरच्या एका इमारतीत भीषण आग लागल्यामुळे दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. वीणा संतूर बिल्डिंगमध्ये ही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळ दाखल झाले. त्यांनी तातडीने या आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग कशी लागली याचा तपास आता पोलिस व अग्निशमन दल करत आहे.
दुपारी १२ वाजेच्या सुमारास इमारतीच्या ग्राउंड प्लस पहिल्या मजल्यावर ही आग लागली. या आगीत ग्लोरी (४३), जोसू रॉबर्ट (८) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर लक्ष्मी बुरा (४०), राजेश्वरी भरतारे (२४), रंजन शाह (७६) हे जखमीं झाले आहेत. जखमींवर उपचार सुरु आहे.
या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. मुंबईत गेल्या काही दिवसात आगीच्या या घटना घडत आहे. या आगीची घटना अचानक घडल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.