इंडिया ऑनलाईन डेस्क
दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॅा. भारती पवार यांचा १ लाख १३ हजार १९९ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत २६ शेवटच्या फेरीचा निकाल आला असून त्यात भगरे यांना ५ लाख ७७ हजार ३३९ मते मिळाली तर पवार यांना ४ लाख ६४ हजार १४० मते मिळाली.
पहिल्या फेरीपासून या भगरे यांनी आघाडी घेतली आहे. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. दिंडोरी लोकसभा मतदार संघात कांद्याचा प्रश्न चांगलाच चर्चेत होता. त्याचा फटका या निवडणुकीत पवार यांना बसला.