इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्याचे मतदान झाल्यानंतर शनिवारी एक्झिट पोल समोर आला आहे. त्यानंतर आज निकाल जाहीर झाला आहे. त्यात महाविकास आघाडीला ३० तर महायुती १७ जागांवर आघाडीवर आहे. तर एक जागा अपक्षाला गेली आहे. भाजप १० तर शिवसेना शिंदे गट ६, राष्ट्रवादी अजित पवार गट १, शिवसेना ठाकरे गट ९, काँग्रेस १३, राष्ट्रवादी पवार गट ७ जागेवर विजय मिळाला आहे. यात काही जण आघाडीवर असून त्यांचे निकाल अद्याप घोषित झाले आहे.
४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी
१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट
२) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट
३) उत्तर पश्चिम मुंबई – रविंद्र वायकर – शिंदे गट (४६ मतांनी विजयी)
४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट
५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट
६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट
७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट
८) औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट
९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट
१०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट
११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट
१२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट
१३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट
१४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट
१५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट
१६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप
१७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस
१८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस
१९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस (आघाडी)
२०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस
२१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस
२२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस
२३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप
२४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस
२५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप
२६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस
२७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस
२८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस
२९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप
३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस
३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट
३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट
३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप
३४) बीड – बजरंग सोनवणे – शरद पवार गट
३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट
३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट
३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप
३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट
३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट
४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप
४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप
४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप
४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष
४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार
४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे
४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे
४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस
४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस