इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या विजयी झाल्या. या मतदार संघात प्रसिध्द वकील अॅड. उज्वल निकम हे भाजपकडून उमेदवार होते. त्यांचा पराभव झाला.
या मतदार संघात अटीतटीची लढत झाली होती. त्यात वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला. काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्षा असलेल्या वर्षा गायकवाड यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी हवी होती. पण, येथे ठाकरे गटाने अनिल देसाई यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्या काहीशा नाराज होत्या. पण, त्यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी जोरदार प्रचार केला.