इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदार संघातून भाजपाच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा लाखभर मतांच्या फरकाने पराभव झाला आहे. भाजपच्या फायर ब्रँण्ड नेत्या म्हणून ओळख असलेल्या इराणी यांचा पराभव हा भाजपला मोठा धक्का आहे. काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल शर्मा या मतदार संघातून विजयी झाले आहेत. २०१९ मध्ये स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अमेठीमध्ये पराभूत केले होते.
त्यानंतर काँग्रेसने हा वचपा राहुल गांधी यांचे सहकारी असलेल्या किशोर लाल शर्मा यांनी काढला. या मतदार संघात पहिल्यापासून स्मृती इराणी यांच्या कामकाजाबाबत नाराजीचा सूर होता. पण, देशातील प्रमुख नेत्या असल्यामुळे त्यांना त्याचा फायदा होईल असे वाटत होते. पण, या ठिकाणी त्यांचा पराभव झाला.