इंडिया ऑनलाईन डेस्क
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत दोन्ही जागेवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात १ लाख ५६ हजार मतांची आघाडी घेतली आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदार संघात भास्कर भगरे हे ६३ हजार ९०९ मतांची आघाडी घेतली आहे. या आघाडीमुळे या दोघांचा विजय निश्चित झाला आहे.
पहिल्या फेरीपासून या दोन्ही उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत ही आघाडी जर कायम राहिली तर नाशिक जिल्ह्यात महायुतीला मोठा धक्का बसणार आहे. महाविकास आघा़डीने जोरदार मुसंडी या दोन्ही मतदार संघात मारली आहे.