इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बंगळुरु : लैंगिक अत्याचार प्रकरणातील अटकेत असलेला आरोपी प्रजल्व रेवण्णा याचा कर्नाटक लोकसभेतून पराभव झाला आहे. देशातील पहिला निकाल जाहीर झाला. त्यात रेवण्णा हे पराभूत झाले आहे.
काही दिवसापूर्वीच जर्मनीतून भारतात दाखल होताच त्याला ‘एसआयटी’ने अटक केली. बंगळुरुच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रज्वल पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्याला गजाआड केले. प्रज्वलने २७ एप्रिलला देश सोडून पलायन केले होते. हसन लोकसभा मतदारसंघातील मतदान संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो फरार झाला होता.
लोकसभा निव़णुकीच्या रणधुमाळीतच गेल्या महिन्यात प्रज्वल याच्यावर लैंगिक छळ, शेकडो व्हिडिओ रेकॉर्डिंग, धमकावणे आणि कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता. रेवण्णाशी संबंधित अनेक व्हायरल व्हिडिओ २६ एप्रिल रोजी हसनमध्ये शेअर करण्यात आले होते. या पेन ड्राईव्हमध्ये २९०० हून अधिक व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला होता. हे व्हिडिओ प्रज्वल यांनी रेकॉर्ड केले होते. यानंतर ते ‘सोशल मीडिया’वर शेअरही झाले. त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण, तो परदेशात फरार झाला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.