मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील गिरणा कारखान्यात मंत्री दादा भुसे यांनी १७८ कोटींचा भ्रष्टचार केला असा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर या बदनामी प्रकरणी दादा भुसे यांनी राऊत यांच्या विरोधात मालेगाव कोर्टात मानहाणीचा दावा दाखल केला. आज त्याची सुनावणी होती. त्यामुळे संजय राऊत मालेगावला येऊन कोर्टात हजर होणार का..? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
पण, आज राऊत यांच्या वकिलांनी कोर्टात दसरा मेळावा असल्याने त्यांना गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी अशी विनंती अर्ज सादर केला. त्यानंतर न्यायालयाने ४ नोव्हेंबर ही पुढील तारीख दिली. या दिवशी राऊत हजर न झाल्यास त्यांना जमीन दिला जाणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. त्यामुळे येत्या ४ नोव्हेंबर रोजी संजय राऊत मालेगाव कोर्टात हजर होणार का याकडे लक्ष लागले आहे.
मंत्री भुसे यांनी जेष्ठ विधीज्ञ सुधीर अक्कर यांच्या मार्फत हा खटला दाखल केला आहे. त्यात जनसामान्यांमध्ये प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने दैनिक सामना वृत्तपत्रातून बदनामी केल्याचा आरोप केला आहे.