गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सर्वाधिक चर्चेचा ठरलेला सांगली लोकसभा मतदार संघात अशी आहे मतमोजणी

by Gautam Sancheti
जून 4, 2024 | 6:28 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 19


सांगली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
44-सांगली लोकसभा मतदार संघात झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय १४ टेबलवर होणार आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने प्रशासनाने सर्व तयारी केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितेले, मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक, शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक अधिकारी, कर्मचारी, पोलीस व सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये आदेश लागू करण्यात आले आहेत.

टपाली मतपत्रिकेची मतमोजणी 20 टेबलवर, ETPBS मतमोजणीसाठी 20 टेबल आणि ईव्हीएमची मतमोजणी विधासभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 टेबलवर होणार आहे. यामध्ये २८१- मिरज विधानसभा मतदार संघातील ३०९ मतदान केंद्रावरील मतांची १४ टेबलवर २३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी, २८२- सांगली विधानसभा मतदार संघातील ३०८ मतदान केंद्रावरील मतांची १४ टेबलवर २२ फेऱ्यांमध्ये मतमोजणी, २८५- पलूस कडेगांव विधानसभा मतदार संघातील २८५ मतदान केंद्रावरील मतांची १४ टेबलवर २१ फेऱ्यांमध्ये मतमोजणी, २८६- खानापूर विधानसभा मतदार संघातील ३४८ मतदान केंद्रावरील मतांची १४ टेबलवर २५ फेऱ्यांमध्ये मतमोजणी, २८७- तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातील २९९ मतदान केंद्रावरील मतांची १४ टेबलवर २२ फेऱ्यांमध्ये मतमोजणी आणि २८८- जत विधानसभा मतदार संघातील २८१ मतदान केंद्रावरील मतांची १४ टेबलवर २१ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.

ईव्च्हीएमच्या मतमोजणीसाठी 6 विधानसभा मतदार संघासाठी प्रत्येकी 14 टेबलची मांडणी करण्यात आली असून प्रत्येक टेबलसाठी एक सुक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक व एक मतमोजणी सहाय्यकाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे यावेळी सांगितले. ETPBS च्या मतमोजणीसाठी 20 टेबलची मांडणी करण्यात आली असून त्यासाठी एकूण 2 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक व एक मतमोजणी सहाय्यकाची नियुक्ती केली आहे. तर टपाली मतपत्रिकेच्या 20 टेबलसाठी प्रत्येक टेबलसाठी एक अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, एक मतमोजणी पर्यवेक्षक व दोन मतमोजणी सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आत्तापर्यंत सैनिक मतदारांच्या 3 हजार 59 आणि टपाली 3 हजार 822 अशा एकूण 6 हजार 881 मतपत्रिका प्राप्त झाल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. मतमोजणीसाठी सुमारे 700 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे म्हणाले, मतमोजणीसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये 750 होमगार्ड, 500 अंमलदार, 50 अधिकारी यासह मतमोजणी व अनुषंगिक बाबीसाठी सांगली जिल्हा पोलीस दलातील सुमारे 80 टक्के पोलीस दल बंदोबस्तासाठी नियुक्त केले आहे. मतमोजणी व निवडणुकीच्या अनुषंगाने कोणीही समाज माध्यमांवर गैरसमज पसरवू नये. आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करू नये. विजयी उमेदवारास विजयी मिरवणूक काढता येणार नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींचा दिवस आनंदात जाईल, जाणून घ्या, मंगळवार, ४ जूनचे राशिभविष्य

Next Post

लोकसभेचा निकालाला सुरुवात…राज्यात महाविकास व महायुतीत काटे की टक्कर

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने वरिष्ठ पासपोर्ट अधीक्षकांच्या मालमत्ता जप्त करण्याचे दिले आदेश

सप्टेंबर 18, 2025
Untitled 25
महत्त्वाच्या बातम्या

हायड्रोजन बॅाम्ब…राहुल गांधी यांची पत्रकार परिषद…बघा लाईव्ह

सप्टेंबर 18, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याचे उद्घाटन2 2
मुख्य बातमी

येत्या १ मे पर्यंत सेवा हमी कायद्यांतर्गत ११०० सेवा डिजीटल होणार…

सप्टेंबर 18, 2025
G1DIHtKXMAAFzBr
संमिश्र वार्ता

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा…शिष्यवृत्तीसाठी आता एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार

सप्टेंबर 18, 2025
G1F4t faQAAKs27 e1758160633125
संमिश्र वार्ता

इतिहास संशोधक, शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

सप्टेंबर 18, 2025
Untitled 24
महत्त्वाच्या बातम्या

स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा गजाआड…आरोपीचा धक्कादायक खुलासा

सप्टेंबर 18, 2025
G1EjK5lXIAA7N0k e1758158586845
महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडिया विरुध्द पाकिस्तानचा पुन्हा सामना….यूएई विरुध्द सामना जिंकल्यामुळे सुपर फोरमध्ये लढत

सप्टेंबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना व्यावसायिक प्रगती साधता येईल, जाणून घ्या, गुरुवार, १८ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 18, 2025
Next Post
IMG 20240603 WA0376 2

लोकसभेचा निकालाला सुरुवात…राज्यात महाविकास व महायुतीत काटे की टक्कर

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011