माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
मंगळवार ४ जून दुपारनंतर महाराष्ट्रातील पुणे दक्षिण, नगर दक्षिण, सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर व गडचिरोली अश्या १२ जिल्ह्यात व लगतच्या जिल्हा परिसरात तुरळक ठिकाणी मान्सून पूर्व वळीव पावसाची दाट शक्यता जाणवते.
बुधवार दि. ५ जून पासून मात्र संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण ३६ जिल्ह्यात भाग बदलत मान्सून पूर्व वळीव पावसाची शक्यता जाणवते. शुक्रवार दि.७ जून पासून मात्र मुंबईसह संपूर्ण कोकणात मात्र मान्सून आगमन पूर्व जोरदार वळीव पावसाची शक्यता अधिक जाणवते. मान्सूनने आज आगेकूच करत कर्नाटक, आंध्र किनारपट्टी, तेलंगणा राज्यात प्रवेश केला आहे.
माणिकराव खुळे
Meteorologist ( Retd.)
IMD Pune