नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मंजू मंगलप्रसाद मिश्रा (रा.डी.के.सोनवणे चौक,संदिप सुपर मार्केट शेजारी शिवाजीनगर) असे मृत वृध्देचे नाव आहे. मंजू मिश्रा या गेल्या ९ मे रोजी सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या होत्या.
या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने कुटूंबियांनी त्यांना आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले होते.उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत डॉ.महेश सोनवणे यांनी खबर दिल्याने पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक गवे करीत आहेत.