नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडाळागावातील बंटी कॉर्नर भागात वाद्यबंद केल्याच्या वादातून दोघांनी एका तरूणास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत लाकडी दांडा व धारदार वस्तूने वार करण्यात आल्याने युवक जखमी झाला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिरोज गुलाब शेख व नाज फिरोज शेख अशी युवकास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत कौफ अश्पाक शेख (१९ रा.केबीएच हायस्कूल समोर,वडाळागाव) या युवकाने फिर्याद दिली आहे. शेख शनिवारी (दि.१) रात्री बंटी कॉर्नर भागात गेला होता. या ठिकाणी वाद्य बंद करण्याच्या वादातून संशयितांशी त्याचा वाद झाला.
यावेळी संतप्त दोघानी त्यास बेदम मारहाण केली. या मारहाणातील लाकडी दांडका व धारदार शस्त्राचा वापर करण्यात आल्याने कौफ शेख जखमी झाला असून अधिक तपास हवालदार ढवळे करीत आहेत.