इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोल आल्यानंतर त्यावर वेगवेगळया नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहे. या पोलवर पहिल्यांदा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया आली असून त्यांनी सांगितले की, आपल्याला फक्त प्रतीक्षा करावी लागेल आणि पहावे लागेल. आम्हाला खूप आशा आहे की आमचे निकाल एक्झिट पोल जे सांगत आहेत त्याच्या अगदी उलट आहेत.
याअगोदर एक्झिट पोलवर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. तर राहुल गांधी यांनी मोदी पोल म्हटले आहे. त्यात आता सोनिया गांधी यांनी अगदी उलट होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.