इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक विभागाच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी डॉ.राजेद्र विखे पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरतांना डॉ.प्रदीप पवार, डॉ.ऐस.आर.पाटील, राजेश खटोड, ऍड.अनंत फडणीस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मैनेजमेंट काउंसिल मेंबर सागर वैद्य, अशोक सावंत, शिवाजीराव जोंधळे, प्रदीप दिघे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शेकडो समर्थक प्राध्यापक,प्राचार्य, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर यावेळी नाशिकमध्ये आले होते.
या निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर दोन दिवसाच्या सुट्टीनंतर पुन्हा अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. डॅा. विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे या निवडणुकीत रंगत वाढणार आहे. शुक्रवारी या निवडणुकीसाठी तब्बल ३९ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले होते. तर कोल्हे विवेक विपीनदादा यांनी दोन तर तिसरा अर्ज डॅा. पानसरे छगन भिकाजी यांनी भरला होता. २६ जून रोजी ही निवडणूक होणार आहे. ७ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
या निवडणुकीसाठी ३१ मे रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. तसेच ७ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. १० जून रोजी अर्जाची छाननी होणार आहे. तर १२ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. २६ जून रोजी सकाळी ८ ते ४ वेळेत मतदान होणार आहे. १ जूलै रोजी मतमोजणी होणार आहे. ५ जूलै पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.