इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील सरदवाडीमध्ये भरधाव येणारा लांब पल्ल्याचा ट्रेलर थेट दुकानांमध्ये घुसल्याची घटना घडली. या अपघातातसुदैवाने रात्रीची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
पुणे-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील सरदवाडी येथे रात्रीच्या वेळी पोकलेन घेऊन जाणारा ट्रेलर थेट सलूनमध्ये घुसून दुर्घटना घडली. महामार्गावर ट्रेलर चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी सलून व्यावसायिक दुकान बंद करून घरी गेले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या अपघाताचा मोठा आवाज झाल्यानंतर नागरिकांसह व्यावसायिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामध्ये सलून व्यवसायिकाच्या दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.