नााशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये १२ ऑक्टोंबर अखेर ८४ टक्के साठा असला तरी बहुतांश धरणे जवळपास ओव्हरफ्लो झाली आहे. पण, गेल्या पावसाळ्यापेक्षा हा पाणीसाठा १६ टक्के कमीच आहे. परतीचा पाऊस जवळपास संपल्यामुळे आता धरणाच्या साठ्यात वाढ होण्याची शक्यता कमी आहे. गंगापूर धरणाचा साठा १०० टक्के तर समुहात ९९ टक्के साठा आहे. ३० जून अखेर जिल्ह्यातील धरणात २१ टक्के साठा होता. त्यानंतर आता हा साठा ८४ टक्के आहे.
जिल्ह्यातील आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर, वाघाड ही आठ धरणे अगोदरच ओव्हरप्लो झाली होती. त्यानंतर जवळपास २० धरणे ओव्हरफ्लो झाली. यात गंगापूर, पुणेगाव, दारणा, मुकणे, कडवा, यासह जवळपास सर्व धरणे आहे.
पण, तिसगाव धरणात ७१ टक्के तर गिरणा धरणात ५६ टक्के साठा आहे. तर माणिकपुंज ३५ व नागासाक्या धरणात शुन्य टक्के पाणीसाठा आहे. गेल्या पावसाळ्यात जिल्हयातील जवळपास सर्व धरण भरली होती. पण, यावेळेस १६ टक्के पाणीसाठा कमी आहे.
Nashik district condition of dams…