इंडिाय दर्पण ऑनलाईन डेस्क
जगातील सर्वांत ऊंच युद्धभूमी असलेल्या सियाचिनमध्ये देशाचं रक्षण करणारा महाराष्ट्राचा सुपुत्र ‘अग्नीवीर’ अक्षय लक्ष्मण गवते हा शहीद झाला. देशरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या वीराला सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली. पण, त्यानंतर सोशल मीडियावरील परस्परविरोधी संदेश आले. त्यानंतर शहीद झालेल्या अक्षय लक्ष्मण यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत भारतीय लष्कराने माहिती दिली. लष्कराने सांगितले की, नियमांनुसार ४८ लाख रुपयांचा नॉन-कंट्रिब्युटरी इन्शुरन्स, ४४ लाख रुपयांचा एक्स-ग्रेशिया, उर्वरित चार वर्षांच्या कार्यकाळासाठी वेतन म्हणजेच १३ लाख रुपयांपेक्षा जास्त, सशस्त्र सेना अपघात निधीतून ८ लाख रुपयांचे योगदान, ३० हजार रुपयांची तात्काळ भरपाई. कुटुंबाला अग्निवीर किंवा सहाय्य आणि सेवा निधीमध्ये योगदान देखील मिळेल. यामध्ये सरकारी योगदान आणि व्याजाचाही समावेश असेल.
अक्षय गवते यांच्या वीरमणानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासह अनेकांनी सरकारसमोर काही प्रश्न उपस्थितीत केले. अक्षय यांच्या कुटुंबीयांसाठी आवाज उठवला. राहुल गांधी यांनी म्हटले की, सेवा के समय न ग्रॅज्युटी न अन्य सैन्य सुविधाएं, और शहादत में परिवार को पेन्शन तक नही..अग्निवीर भारत के वीरों के अपमान की योजना है..
तर आ. रोहित पवार यांनी अग्नीवीर असल्याने देशासाठी बलीदान देऊनही गवाते यास ना पेन्शन मिळणार, ना इतर सरकारी लाभ मिळणार. पंजाबमधील एक अग्नीवीर शहीद झाल्यानंतरही त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले नसल्याचा अनुभव आपण नुकताच घेतलाय. ‘अग्नीवीर’ ही देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांची अवहेलना करणारी योजना असल्याने त्यांचा सन्मान राखण्यासाठी आपण सर्वांनीच या योजनेला कडाडून विरोध करायला पाहीजे असे म्हटले. त्यानंतर लष्कराने दिलेली ही माहिती समोर आली आहे.