इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः लोकसभा निडवणुकीच्या निकालानंतर भाजपच्या पक्ष संघटनेत मोठे फेरबदल होणार आहेत. भाजपचे रार्ष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची सहा जूनला मुदत संपते आहे. गेल्या वर्षी त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. आता ती मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि महासचिव विनोद तावडे यांची नावे चर्चेत आहेत.
केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते राज्य पातळीपर्यंत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. नड्डा यांचा कार्यकाळा सहा जून रोजी संपणार आहे. त्यानंतर भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहेत. भाजपत संघटनात्मकदृष्ट्या पक्षात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी तावडे यांच्या नावाची सध्या सुरू झाली आहे.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चव्हाण, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान आदी नावासोबत तावडे यांचे नावही चर्चेत आहे. त्यात यादव आणि तावडे यांच्यात स्पर्धा आहे. यादव आणि तावडे या दोघांवरही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा विश्वास आहे.
नड्डा यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी जून महिन्यात संपला. त्या वेळी त्यांना एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती. पक्षाच्या घटनेनुसार अध्यक्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच नवीन अध्यक्षाची निवड करण्यात येते.