इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २१ दिवसाच्या जामीन नंतर आज तिहार तुरुंगात सरेंडर केले. सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केल्यामुळे त्यांनी आज आत्मसर्पण केले. सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर ते ५० दिवसानंतर ते तिहार जेलमधून बाहेर आले होते. त्यानंतर २१ दिवस त्यांनी इंडिया आघाडीचा प्रचार केला.
या आत्मसर्पणानंतर दिल्लीचे मंत्री आणि आपचे नेते सौरभ भारद्वाज म्हणाले की, त्यांना बाहेर यायला किती वेळ लागेल हे माहित नाही, आम्हाला सरकार, पक्ष आणि पक्षाचे संरक्षण करावे लागेल.
दिल्लीचे मंत्री आतिशी यांनी अरविंद केजरीवाल यांना २१ दिवसांचा जामीन दिल्याबद्दल आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानू इच्छितो. या २१ दिवसांत त्यांनी इंडिया आघाडीच्या अनेक पक्षांसाठी प्रचार केला. ही निवडणूक फक्त एका पक्षाची नव्हती, ही निवडणूक होती. देशाच्या संविधानाचे रक्षण करा, आम्ही न्यायव्यवस्थेचा आदर करतो, म्हणून अरविंद केजरीवाल यांनी नियोजित तारखेला आत्मसमर्पण केले आहे.