इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादी अजित पवाराला मोठा धक्का बसणार असल्याचा अंदाज काल एक्झिट पोलने व्यक्त केला. त्यानंतर अजित पवार गटात निराशेचे वातावरण असतांना आज अरूणाचल प्रदेश विधानसभेच्या निकालानंतर मात्र दिलासा मिळाला आहे.
येथील निवडणुकीत अजित पवार गटाने तीन जागा जिंकल्या आहे. गेल्या महिन्यात १९ एप्रिलला विधानसभेच्या ६० जागांसाठी मतदान पार झाले होते. यानंतर आज मतमोजणी झाली. या निकालात तीन उमेदवार विजयी झाले आहेत. टोको तातूंग, लिखा सोनी आणि निख कमिन हे उमेदवार विजयी झाले आहेत. अजित पवार गटाकडून एकूण १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. २ उमेदवारांचा थोडक्यात पराभव झालाय. तर ३ उमेदवार जिंकून आले आहेत.
अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने आघाडी ६० पैकी ४६ जिंकल्या आहे. त्यात १० जागा अगोदरच बिनविरोध झाल्या होत्या. गेल्या वेळी भाजपने ४२ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजपला येथे सरकार स्थापन करण्यासाठी इतर पक्षांची फारशी गरज नाही. पण, महाराष्ट्रात भाजपसोबत राष्ट्रवादी असल्यामुळे त्याचा फायदा येथील आमदारांना मिळू शकतो.