इंडिाया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीःअरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने आघाडी घेतली आहे. ४६ हून अधिक जागी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. सिक्कीममध्ये स्थानिक पक्षाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. काँग्रेसला तिथे फारसे स्थान नाही.
अरुणाचलमध्ये विधानसभेच्या साठ आणि सिक्कीममध्ये ३२ जागा आहेत. गेल्या वेळी अरुणाचलमध्ये भाजपने ४२ जागा जिंकल्या होत्या, तर सिक्कीममधील ३२ पैकी १७ जागांवर सिक्कीम क्रांती पार्टी जिंकली होती. आता या दोन्ही पक्षांनीच आघाडी घेतली आहे. सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा ३१ जागांवर तर सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट एका जागेवर आघाडीवर आहे. अरुणाचल प्रदेशात भाजपने ४६ जागांवर आघाडी घेतली आहे. नॅशनल पीपल्स पार्टी पाच, तर काँग्रेस १ जागेवर आघाडीवर आहे.
अरुणाचल प्रदेशात भाजपने दहा जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. एका जागेवर नॅशनल पीपल्स पार्टी तर एका जागेवर अपक्ष उमेदवार पुढे आहे.