इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्याचे मतदान काल संपल्यानंतर विविध वाहिन्यांनी एक्झिट पोल जाहीर केले. त्यात सर्वांनीच भाजप आघाडीला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. पण, एकमेव देशबंधुच्या पोलने इंडिया आघाडीचे सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. देशबंधूचे हे एकमेव एक्झिट पोल आहे. ज्यामध्ये भाजप नाही तर काँग्रेसची सत्ता येणार असल्याचे म्हटले आहे.
DB Live (देशबंधु) वर दाखवलेल्या एक्झिट पोलनुसार देशात इंडिया आघाडीला २६० ते २९५ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला तर भाजप आघाडीला २१५ ते २४५ जागा मिळण्याचे त्यांनी सांगितले आहे. तर २४ ते ४८ जागा इतर खात्यात त्यांनी दाखवल्या आहे.
देशबंधूच्या या पोलमध्ये महाराष्ट्राचा अंदाज व्यक्त करतांना थेट महाविकास आघाडीला २८ ते ३० जागा मिळणार असल्याचे म्हटले आहे. तर भाजप आघाडीला १८ ते २० जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे बिहारमध्ये भाजप आघाडीला १४ ते १७ व इंडिया आघाडीला २४ ते २६ जागा मिळत असल्याचे म्हटले आहे. मध्य प्रदेशात भाजप आघाडीला २४ ते २६ व इंडिया आघाडीला ३ ते ५ जागा मिळेल असे म्हटले आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजप आघाडीला ४६ ते ४८ जागा मिळू शकतात. तर इंडिया आघाडीला ३२ ते ३४ जागा मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप आघाडीला ११ ते १३ तर टीएमसीला २६ ते २८ जागा मिळू शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे.