नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळी खडक जांब गावाजवळ सगुणा कंपनी समोर अॅपे रिक्षाचा झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले आहे. रिक्षा चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे रिक्षा रस्त्याच्या कडेला खड्यात गेली.
या अपघातात सोनाली शिवाजी राठोड (३०) लक्ष्मी आप्पा चव्हाण (४८) नैना शिवाजी राठोड (५) अंजली शिवाजी राठोड (१०) शिवाजी भगवान राठोड (३५) मु पो लोंजे ता. चाळीसगाव हे जखमी झाले आहे. तर अॅपे रिक्षा MH 48 BV 9791 चे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघाताची माहिती फोनवर मिळताच शिरवाडे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत अॅम्बुलन्स लगेचच अपघात स्थळी पोहोचली व पेशंटला वडाळीभोई येथील सरकारी हॅास्पिटल उपचारासाठी दाखल करण्यात आले.