नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुन्ह्या मध्ये नाव न येण्याकरिता १२ हजार रुपयाची लाच घेतांना श्रीरामपूर पोलिस स्टेशनचे पोलिस हेड कॅान्स्टेबल रघुनाथ खेडकर व खासगी इसम राजू शामकुमार श्रीवास्त एसीबीच्या जाळ्यात अडकला. याप्रकरणी दोघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे भावाच्या नावे टाटा एच जी व्ही टिप्पर मालकीचा होता,सदर टिप्पर त्यांच्या भावानी २२ डिसेंबर २०२३ रोजी वाहन खरेदी पावती करून त्यांचे नातेवाईकास विकून ताब्यात दिला होता. सदर टिप्पर ५ फेब्रुवारी २०२४ रोजी अवैद्य मुरूम वाहतूक करतेवेळी तहसील कार्यालय श्रीरामपूर यांनी पकडून तहसील कार्यालय श्रीरामपूर येथे जमा केला होता. सदरचा टिप्पर तहसील कार्यालय श्रीरामपूर आवारातून चोरी झाला होता त्यावरून अज्ञात इसमाविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन ७ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास आलोसे खेडकर हे करत होते.
तपासामध्ये तक्रारदार यांचेकडुन टिप्पर खरेदी केलेले नातेवाईक व त्यांच्या चालकानेच टिप्पर चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदार यांचे नातेवाईक व टिप्पर चालकाला आलोसे खेडकर यांनी सीआरपीसी 41 (1)(अ) प्रमाणे नोटिस दिली होती.सदर गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने आलोसे खेडकर यांनी ३१ मे रोजी यातील तक्रारदार यांची भेट घेऊन तक्रारदार यांच्याकडे त्यांचे भावाकरिता सीआरपीसी ९१ प्रमाणे नोटीस दिली व सदर गुन्ह्या मध्ये तक्रारदार यांचे भावाचे नाव न येण्याकरिता तक्रारदार यांचेकडे ४० हजार रुपयांची मागणी करुन तक्रारदार व त्यांचे टिप्पर खरेदी केलेले नातेवाईक यांना १ जून रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे बोलविले असल्याबाबतची तक्रार ला प्र वि अहमदनगर कडे प्राप्त झाली होती. त्यानंतर पडताळणी करण्यात आली.
या पडताळणी दरम्यान खेडकर यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष २० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती १२ हजार रुपयांची मागणी केली व सदर लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. यशस्वी सापळा कारवाई दरम्यान सदरची लाच रक्कम खेडकर यांनी खाजगी इसम राजु श्रीवास्तव यांच्याकडे देण्यास सांगितली. खाजगी इसम श्रीवास्तव यांनी खेडकर यांचे सांगणे वरुन पंचासमक्ष लाच स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले. खेडकर यांना ताब्यात घेऊन दोघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
यशस्वी सापळा कारवाई
युनिट –अहमदनगर.
तक्रारदार- पुरुष,वय-43 वर्षे
आलोसे-1) रघुनाथ आश्रुबा खेडकर,वय-55 वर्षे, पोहेकॉ ब. नं. 563, नेमणूक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन,ह.रा. पोलीस वसाहत, घुलेवाडी, संगमनेर जि. अहमदनगर मु. रा. चिंचपूर इजदे ता. पाथर्डी जि. अहमदनगर
2) खा. इ. राजू शामकुमार श्रीवास्तव,वय-46 वर्षे,धंदा-चहाची टपरी, रा. के. व्हि. रोड,भैय्या गल्ली,श्रीरामपूर ता. श्रीरामपुर,जि.अहमदनगर
*लाचेची मागणी- 20,000/- रुपये तडजोडीअंती 12000/- रुपये
*लाच स्विकारली- 12,000/ रुपये
*हस्तगत रक्कम- 12,000/-रुपये
*लालेची मागणी – दि.01/06/2024
*लाच स्वीकारली – दि. 01/06/2024
लाचेचे कारण
यातील तक्रारदार यांचे भावाच्या नावे टाटा एच जी व्ही टिप्पर मालकीचा होता,सदर टिप्पर त्यांच्या भावानी दि. 22/12/2023 रोजी वाहन खरेदी पावती करून त्यांचे नातेवाईकास विकून ताब्यात दिला होता. सदर टिप्पर दि.05/02/2024 रोजी अवैद्य मुरूम वाहतूक करतेवेळी तहसील कार्यालय श्रीरामपूर यांनी पकडून तहसील कार्यालय श्रीरामपूर येथे जमा केला होता. सदरचा टिप्पर तहसील कार्यालय श्रीरामपूर आवारातून चोरी झाला होता त्यावरून अज्ञात इसमाविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दि.07/02/2024 रोजी गुरनं 144/2024 भादवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास आलोसे खेडकर हे करत होते.तपासामध्ये तक्रारदार यांचेकडुन टिप्पर खरेदी केलेले नातेवाईक व त्यांच्या चालकानेच टिप्पर चोरी केल्याचे निष्पन्न झालेने तक्रारदार यांचे नातेवाईक व टिप्पर चालकाला आलोसे खेडकर यांनी सीआरपीसी 41 (1)(अ) प्रमाणे नोटिस दिली होती.सदर गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने आलोसे खेडकर यांनी दि.31/05/2024 रोजी यातील तक्रारदार यांची भेट घेऊन तक्रारदार यांच्याकडे त्यांचे भावाकरिता सीआरपीसी 91 प्रमाणे नोटीस दिली व सदर गुन्ह्या मध्ये तक्रारदार यांचे भावाचे नाव न येण्याकरिता तक्रारदार यांचेकडे 40000/- रुपयांची मागणी करुन तक्रारदार व त्यांचे टिप्पर खरेदी केलेले नातेवाईक यांना आज दि. 01/06/2024 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे बोलविले असल्याबाबतची तक्रार ला प्र वि अहमदनगर कडे दिनांक 01/06/2024 रोजी प्राप्त झाली होती त्यानुसार दि. 01/ 06/2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली,पडताळणी दरम्यान
आलोसे क्र.1 यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष 20000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 12000/-रुपयांची मागणी केली व सदर लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली.यशस्वी सापळा कारवाई दरम्यान सदरची लाच रक्कम आलोसे खेडकर यांनी खाजगी इसम राजु श्रीवास्तव यांच्याकडे देण्यास सांगितली असता खाजगी इसम श्रीवास्तव यांनी आलोसे यांचे सांगणे वरुन आलोसे तसेच पंचासमक्ष लाच स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले तसेच आलोसे खेडकर यांना ताब्यात घेवुन आलोसे खेडकर व खाजगी इसम श्रीवास्तव यांचे विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ *सापळा व तपास अधिकारी
श्री.राजू आल्हाट,
पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. अहमदनगर. मोबा.नं.9420896263
▶️ *सापळा पर्यवेक्षण अधिकारी*
श्री. प्रवीण लोखंडे, पोलीस उपअधीक्षक, ला प्र. विं, अहमदनगर, मो. क्र.7972547202
▶️ सापळा पथक
पोलिस अंमलदार किशोर लाड, बाबासाहेब कराड , गजानन गायकवाड, चापोहेकॉ दशरथ लाड