इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
प्रसारमाध्यमांच्या काही विभागांमध्ये प्रसारित केल्या जाणाऱ्या बातम्यांच्या संदर्भात असे स्पष्ट केले जाते आहे की, मान्यताप्राप्त ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटर्स (ADTC) च्या संदर्भात तरतुदी निर्धारित करणारे नियम 31B ते 31J जे दिनांक 07.06.2021 च्या GSR 394(E) द्वारे केंद्रीय मोटार वाहन कायदा 1989 मध्ये अंतर्भूत करण्यात आले होते आणि हे नियम 01.07.2021 पासून लागू करण्यात आले असून दिनांक 01.06.2024 पासून यात कोणताही बदल अपेक्षित नाहीत.
मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 12 मध्ये मोटार वाहने चालवण्याच्या सूचना देण्यासाठी ड्रायव्हिंग स्कूल्स किंवा आस्थापनांचा परवाना आणि नियमन करण्याची तरतूद असल्याचे देखील पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या संस्थेद्वारे मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग स्कूल्स किंवा आस्थापनांसाठी पोट कलम (5) आणि (6) समाविष्ट करण्यासाठी मोटार वाहन (सुधारणा) कायदा, 2019 द्वारे त्यात सुधारणा करण्यात आली आहे.
अशा मान्यताप्राप्त ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटर्सची मान्यता राज्य परिवहन प्राधिकरण किंवा केंद्रीय मोटार वाहन कायदा 1989 च्या नियम 126 मध्ये संदर्भित कोणत्याही परीक्षण संस्थेच्या शिफारशींवर केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या कोणत्याही अधिकृत संस्थेद्वारे मंजूर केली जाऊ शकते.
मान्यताप्राप्त ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटर्सच्या तुलनेत कमी कठोर आवश्यकता असलेले इतर प्रकारचे ड्रायव्हिंग स्कूल जे केंद्रीय मोटार वाहन कायदा 1989 च्या नियम 24 अंतर्गत स्थापित आहेत, ते केंद्रीय मोटार वाहन कायदा 1989 च्या नियम 27 च्या पोट -नियम (d) नुसार अभ्यासक्रम (फॉर्म 5) यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देखील जारी करु शकतात. असे असले तरीही, हे प्रमाणपत्र त्याच्या धारकास केंद्रीय मोटार वाहन कायदा 1989 च्या नियम 15 च्या पोट नियम (2) अंतर्गत ड्रायव्हिंग चाचणीच्या आवश्यकतेपासून सूट देत नाही.