इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली : जगात शांतता नांदावी म्हणून एकीकडे जगभरातील बहुतांश देश आणि त्या देशाचे प्रमुख प्रयत्न करीत असतानाच जगात दुसऱ्या महायुद्धानंतर देखील अनेक ठिकाणी दोन देशांमध्ये संघर्ष आणि युद्ध सुरूच आहे, असे दिसून येते. मग जर्मनी, इटली, कोरिया, अमेरिका, रशिया, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, युक्रेन इराक, इराण यासारख्या देशांमध्ये या युद्धाचे ढग वारंवार किंवा काही काळांसाठी येतात आणि जातात. सध्या देखील इस्रायल, पॅलेस्टाईन तसेच गाझा पट्टीमध्ये युद्ध सुरू आहे. हमस दहशतवादी संघटनेने इस्रायलवर हल्ले केल्याने इस्रायलने गाजा पट्टी आणि पॅलेस्टाईनवर प्रतिउत्तरादाखल हल्ले केल्याने या युद्धाचा भडका उडाला आहे. त्यामध्ये जगभरातील प्रमुख देश आणि देशांचे प्रमुख त्या देशांचे प्रमुख यांना चिंता वाटू लागली आहे. हमस या दहशतवादी संघटनाच्या दहशतवादी सैनिकांनी युध्दाप्रसंगी काही नशेच्या गोळ्यांचे सेवन केल्याचे उघड झाले आहे.
सध्या नशिली किंवा अमली पदार्थांच्या तस्करीचे भारतात देखील काही शहरांमध्ये सावट पसरले असून त्याच्या चर्चा होत असतानाच तिकडे इस्रायल पॅलेस्टाईन आणि गाझापट्टीमध्ये आपली पदार्थांच्या सेवनाच्या परिणाम संदर्भात आता जगभरात चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या या युध्दात पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
‘कॅप्टगॉन’ गोळ्यांची यामुळे चर्चा
दरम्यान, हा हल्ला करताना हमासच्या दहशतवाद्यांनी ‘कॅप्टगॉन’ नावाच्या गोळ्या घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इस्रायलच्या भूमीवर मृतावस्थेत आढळलेल्या हमासच्या दहशतवाद्यांच्या खिशात या गोळ्या आढळल्या आहे. कॅप्टगॉन हे ‘अॅम्फेटामाईन’ प्रमाणेच एक उत्तेजक म्हणून काम करते. १९८० मध्ये जगातील अनेक देशांनी या औषधावर बंदी घातली. अॅम्फेटामाईन हा ड्रग्ज मानवाच्या मज्जासंस्थेला उत्तेजना देतो. शरीरात उर्जा संचारल्यासारखे वाटते.
ही आहे किंमत
या ड्रग्जमुळे झोप येत नाही. ड्रग्ज घेतल्यानंतर संबंधित व्यक्ती जास्त काळासाठी जागे राहू शकतो. ड्रग्ज घेतल्यानंतर उत्साहपूर्ण वाटते. कॅप्टगॉनची एक गोळी ३ ते २५ डॉलर्सला म्हणजे सुमारे ५०० ते २००० रुपयांना मिळते. मात्र या गोळ्यांच्या सेवनामुळे शरीरावर अनेक दुष्परीणाम होतात.