इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभेच्या निवडणुकीचा मतदानाचा सातवा टप्पा आज झाल्यानंतर एक्झिट पोल विविध वाहिन्यांनी दाखवणे सुरु केले आहे. या सर्व एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे तिसरी बार मोदी सरकार असे जवळपास हे पोल दाखवत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने जनतेचा पोल म्हणून २९५ जागावर विजय मिळवू असा अंदाज व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात टीव्ही ९ व एबीपी माझा सी व्होटर व झी २४ तासचा एक्झिट पोल समोर आला आहे. त्यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये महायुती व महाविकास आघाडीला कितक्या जागा मिळणार याचा अंदाज व्यक्त केला आहे. या सर्व्हेमध्ये टीव्ही ९ने महायुतीला २२ तर महाविकास आघाडीला २५ जागा व इतर १ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.