नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील विंचूर येथील कांदा व्यापारी सचिन परदेशी यांची सहा लाख रुपये असलेली बॅग धूम स्टाईलने चोरट्यांनी चोरुन नेली. परदेशी यांनी कांद्याचे शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यासाठी बँकेतून सहा लाख रुपये काढले. त्यानंतर ते जात असतांना मोटर सायकल वरून आलेल्या दोघे चोरट्यांनी सचिन परदेशी यांच्या गाडीवरील सहा लाख रुपये असलेली बॅग ओढून धूम स्टाईलने चोरी करत लंपास केली.
विंचूर येथील चौफुलीवर असलेल्या पोलीस चौकी जवळ घडल्याने कांदा व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघे भामट्या चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहे.