इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इंडिया आघाडीची मतमोजणीच्या दिवसापर्यंतच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय पक्षांच्या नेत्यांची आज अनौपचारिकपणे बैठक आज संपन्न झाली. अजूनही लढत संपलेली नसून सर्वच पक्षांचे नेते व कार्यकर्ते कमालीचे सतर्क असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या बैठकीनंतर २९५ जागा इंडिया आघाडी जिंकणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जून खरगे यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार असून विविध मुद्द्यावर तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी ते म्हणाले की, आमच्या सर्व शक्तीनिशी लढलो आहोत आणि भारतातील जनतेने आम्हाला पाठिंबा दिल्याने सकारात्मक परिणामाची खात्री असल्याचे म्हणाले.बदलेगा भारत, जीतेगा भारत असे ते म्हणाले.