नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापालिकेचे लोखंडी बाकडे चोरणा-या त्रिकुटाचा पर्दाफास झाला आहे. एकास अटक करीत दोघा अल्पवयीन मुलांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णा संजय नागरे (२० रा.म्हाडा वसाहत सामनगावरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत माणिक सुदाम नागरे (रा.चाडेगाव ता.जि.नाशिक ) यांनी फिर्याद दिली आहे.
संशयित शुक्रवारी (दि.३१) पहाटेच्या सुमारास चाडेगाव येथील लोखंडे बाकडे चोरतांना मिळून आले. बाकडे चोरून नेतांना रंगेहात पकडलेल्या संशयितांना नागरीकांनी पोलीसांच्या स्वाधिन केले असून त्यातील एकास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.