नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उंटवाडतील तिडके नगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे पाच लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे व भांड्याचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र शंकर पिल्ले (रा.शिवम बंगलो,रिगल सॉलीटायर अपा.समोर तिडके नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पिल्ले कुटूंबिय दि.१४ ते २८ मे दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी पिल्ले यांच्या बंद घराच्या बेडरूमच्या खिडकीचे गज कापून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटात ठेवलेली रोकड सोन्याचांदीचे दागिणे व भांडी असा सुमारे ४ लाख ९१ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक फुलपगारे करीत आहेत.