इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे अपघात प्रकरणावरुन काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा मंत्री शंभुराज देसाई यांच्यावर निशाणा साधत जोरदार हल्ला केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत प्रश्न उपस्थितीत केला आहे. त्यात देसाई आहात की कसाई….? असा प्रश्न विचारत टीका केली आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आपल्या मुलांच्या भवितव्याचा आहे, पुणेकरांचे रक्षण करतांना लाख अडथळे आले तरी , हा रवि धंगेकर मागे हटणार नाही. पुण्यनगरीचे सांस्कृतिक वैभव खराब करणाऱ्या तुमच्या खात्यातील हप्तेखोर मुजोर अधिकाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालताय. पबमध्ये १५ -१६ वर्षाच्या मुलांना दारू दिली जाते, ते बाहेर येऊन गाडीखाली माणसं चिरडतात. आमची पुढची पिढी डोळ्यांसमोर अक्षरशः बरबाद होतीये. हे सर्व होऊन देखील निवांत असणारे तुम्ही नेमकं….देसाई आहात की कसाई….?