नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिकरोड भागातील दारू दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे ११ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात दुकान परवान्यासह मद्य आणि महत्वाच्या कागदपत्रांचा समावेश असून याप्रकरणी पोलीस दप्तरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धर्मेद्र आसमदास मुलचंदानी (रा.दत्त मंदिर,ना.रोड) यांनी फिर्याद दिली आहे. मुलचंदानी यांचे शिवाजी पुतळा भागातील मिना बाजार परिसरात रॉयल लिकर हाऊस नावाचे देशी दारूचे दुकान आहे. गुरूवारी (दि.३०) रात्री अज्ञात चोरट्यांनी दारू दुकानाचे लोखंडी पत्रा उचकटून ही चोरी केली.
दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी दारू दुकानाचा परवाना, दारूच्या बाटल्या तसेच दुकानाचा नकाशा, नोकरनामा व अन्य महत्वाची कागदपत्र असा सुमारे १० हजार ८०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.