इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला असून काँग्रेसचे नेते आणि मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक अॅड. संदीप गुळवे यांनी आज शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. काँग्रेस व शिवसेना दोन्ही पक्षाच्या सहमतीतून खासदार संजय राऊत आणि सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत गुळवेंचा पक्षप्रवेश झाला.
ठाकरे गटाचे किशोर दराडे हे ठाकरे गटाचे आमदार होते. पण, यावेळेस ठाकरे गटाने उमेदवार बदलत हा निर्णय घेतला आहे. दराडे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा असतांना ठाकरे गटाने हा मोठा धक्का दिला आहे.
अॅड. संदिप गुळवे यांचे शिक्षण बी.ए., एल.एल.बी. पर्यंत झालेले असून नाशिक जिल्हा परिषदेचे २०१२ ते २०१७ पर्यंत ते सदस्य होते. मराठा विद्या प्रसारक मंडळाचे ते संचालक आहेत. नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी कामगिरी बजावली आहे.