नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अमृतधाम परिसरात झोक्यावरून पडल्याने गळफास लागून ६० वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिनकर मधुकर खारके (रा.जय दुर्गा सोसा.गोपाळनगर) असे मृत वृध्दाचे नाव आहे. खारके गुरूवारी (दि.३०) रात्री घरात लहान मुलांसाठी बांधलेल्या झोक्यावर नेहमी प्रमाणे बसले असता ही दुर्घटना घडली. अचानक तोल जावून पडल्याने त्यांना गळफास लागला होता.
या घटनेत बेशुध्द झाल्याने जावई अमोल बगड यांनी तात्काळ नजीकच्या अपोलो हॉस्पिटल येथे त्यांना दाखल केले असता डॉ. प्रविण जाधव यानी मृत घोषीत केले. अधिक तपास पोलीस नाईक काळे करीत आहेत.