इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : येत्या १ नोव्हेंबरपासून काही महत्वाचे बदल होणार आहेत. दारू किंवा मद्य पिणे प्रत्येकाचा एच्छिक वैयक्तिक हक्क आहे, असे म्हटले जाते, सर्वच भागांमध्ये दारू किंवा अन्य प्रकारचे मद्य विक्री जोरदारपणे सुरू असते. यावर सध्या २० टक्के कर वाढलेला असताना आणखी ५ टक्के कर तथा वॅट वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने आता सुमारे २५ टक्के कर हा मद्य आणि दारू आणि इतर मद्यावर लावला जाणारा असून त्यामुळे तळीरामाच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. विशेषतः बार कॅफे व अन्य ठिकाणी बसणाऱ्या मद्यपींसाठी हा निर्णय महागाचा ठरू शकतो. मात्र यामुळे खासगी जागेमध्ये किंवा घरातच मद्य पिण्याऱ्यांची संख्या वाढू शकते, इतकेच नाही तर वाहन चालवताना मद्य पिणे वाढून त्यामुळे मद्यप्राशन केल्यास अपघात वाढण्याची शक्यता देखील वर्तण्यात येत आहे.
राज्य सरकारने परमिट रुममध्ये विक्री होणाऱ्या मद्यावरील ‘व्हॅट’मध्ये ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बार, क्लब आणि कॅफेमध्ये जाऊन मद्याचा आस्वाद घेणाऱ्या मद्यशौकिनांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. सरकारने याबाबतचा निर्णय जाहीर केला. बारमधील मद्य दरात वाढ होणार असली तरी स्टार हॉटेल्समधील मद्याच्या दरावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण तेथील व्हॅट आधीपासूनच २० टक्के इतका आहे.
मात्र बार, लाउंज आणि कॅफे व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. ग्राहक मद्य महाग झाल्यामुळे या ठिकाणी मद्यपान करण्याऐवजी घरी किंवा इतर स्वस्त पर्यायांकडे वळू शकतात. मात्र त्यामुळे ड्रिंक अँड ड्राईव्हसारख्या समस्या वाढू शकतात. ग्राहक मद्य महाग झाल्यामुळे घरी किंवा इतर ठिकाणी मद्यपान करून बाहेरून वाहन चालवू शकतात. यामुळे अपघात होण्याचा धोका वाढतो. पण, सरकारच्या या निर्णयाला बार, कॅफे, रेस्टॉरंट मालक व व्यवसायिकांनी विरोध केला आहे.