इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
४ जून च्या नंतर अजित पवार गटाचे बरेच आमदार हे आता बाहेर पडणार आहेत. कारण ४ जूनच्या नंतर अजित दादांची नौका ही बुडणार आहे. आणि त्या बुडणाऱ्या नौकेत आता कोणी बसणार नाही. स्वतः सुनील तटकरे हे सुध्दा काही आमदारांन घेऊन बंड करणार असणार असून त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केले आहे.
अजितदादा गटाचे अनेक लोक आम्हाला फोन करत असून पक्षात प्रवेश करु इच्छित असल्याचा दावाही त्यांनी केला. आमच्या पक्षात ज्याचं सिल्वर ओकवर प्रेम आहे. तेवढीच लोक आता आमच्या पक्षात शिल्लक राहिली आहेत. जे जाणारे होते ते आता गेलेले आहेत. त्यामुळे अजून कोणी जाणार नाही पण आपण बघितलं असेल गरवारे क्लबच्या बैठकीमध्ये की अजित पवार गट हा पूर्ण पराभूत मानसिकतेमध्ये गेलेला आहे. आणि आपल्या पक्षाला वाचवण्यासाठी केविल वाणी धडपड करत असल्याचेही ते म्हणाले.