इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्राची हास्यजत्रेमधून समीर चौघुले बाहेर पडणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामागे नेमकं कारणही समोर आले आहे. चौघुले यांनी सम्या सम्या मैफिलीत माझ्या या नव्या शोची घोषणा केली आहे. त्यामुळे हास्यजत्रेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. हास्यजत्रेतून घराघरात पोहचलेले समीर चौघुले हे जर या शोमध्ये नसले तर काय होईल अशी चिंता प्रेक्षकांना पडली आहे.
सोसल मीडियावर समीर चौघुले यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे, प्रेम हे ट्रेनमध्ये चढताना हुकलेल्या संधीसारखं असत, जे संधीच सोनं करतात त्याना संसाराची विंडोसीट मिळते.. तर काही जणांच्या मते प्रेम हे प्राजक्ताच्या सड्यासारखं असत जे नेहेमी पायदळी तुडवलं जातं….तर काही जणांच्या मते खरं प्रेम म्हणजे “एखाद जुनं पुस्तक चाळताना सापडलेलं मोराचं पीस”…लग्न म्हणजे काय यावर कोणीतरी म्हटलंय “साबणाची संपत आलेली जुनी वडी नव्या कोऱ्या साबणाला चिकटवणे आणि साबण मोठा करून पुढील अंघोळ करणे”…काही जणांच्या मते लग्न म्हणजे “मुंडावळ्या बांधून वाजत गाजत संसाराच्या बाईकवर बसून ‘मौत का कुव्वा’ मध्ये उडी मारणे” …..वगैरे वगैरे….
https://www.instagram.com/p/C7oKiN3tYFh/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==